वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

येता जाता थोर कष्टलो

🙏 4. संत नामदेव · ABH-083233 · अभंग क्र. ८७७

877.
येता जाता थोर कष्टलो गर्भवासी | पडिलो गा उपवासी प्रेमेविण ॥१॥
बहुतांचा सेवकु जाला काकुळती | न पावे विश्रांति कधी काळी ॥२॥
ऐसे माझे मन सिणले नानापरी | घालीन आभारी संताचिया ॥३॥
वियोगे संतांच्या व्याकुळ चिंतातुर | हिंडे दारोदार दीन रूपे ॥४॥
परि कोणी संतांच्या न घालिती चरणी | तळमळी अनुदिनी श्रांत सदा ॥५॥
माझे माझे म्हणवूनि ज्या घाली मिठी | दिसे तेचि दिठी नाही होय ॥६॥
तया शोकानळे संतप्त आंदोळे | गेले ते न मिळे कदा काळी ॥७॥
न देखत ठायी देखावया धावे | भ्रांति भुले भावे नाना मार्गी ॥८॥
तुझा स्वरूपानंदु नाही ओळखिला | जाहली विठ्ठला हानि थोर ॥९॥
लोहाचा कवळु लागला परिसाते | पढिये सर्वांते होय जेवी ॥१०॥
नामा म्हणे तैसी भेटी संतचरणी | करुनि त्रिभुवनी होईन सरता ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग