विठोबाच्या गांवा जाई
429.
विठोबाच्या गांवा जाईन धांवोनी |घालीन लोळणी चरणांवरी॥१॥
व णभाग दवडिला म्हणेल |जीविंच पुसेल जडभारी ॥२॥
हरुषे लोळत जाईन महाद्वारा |भेटाया सामोरा येईल मज ॥३॥
उचलोनी वोसंगे घेयील आदरे |मुख पीतांबरे पुसिल माझे ॥४॥
धरोनी बाहुवटी उठवील हस्तकी |ठेवील मस्तकी अभयकर ॥५॥
राही रखुमाइ माता सत्यभामा |कडे घेऊनि नामा बुझाविला ॥६॥
