वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

मोकळा मार्ग पंढरीचा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087320 · अभंग क्र. ४७१

471.
मोकळा मार्ग पंढरीचा । नाही साधन करणे साचा । योग अभ्यासाचा । श्रमाचि नको ॥१॥
जाय जाय पंढरपुरा । पाहे दीनांचा सोयरा । पुंडलिकें थारा । दिधला जाय आवडी ॥२॥
तेथे करिता वसती । नाही तया पुनरावृत्ती । जन्ममृत्युची खंती न करी कांही ॥३॥
पावन तीर्थ महिवरी । समान या नाही दुसरी । एका जनार्दनी निर्धारी । प्रेमे वारी करिती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग