वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

भांडणाची रीती आयकिली

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076353 · अभंग क्र. ४९९

499.
भांडणाची रीती आयकिली संती ।
सोडवील हाती धरूनिया ॥१॥
हा काय देइल विचारी मनासी ।
येणे कोणत्यासी रोख दिल्हे ॥२॥
निवृत्तीचे हाते पावले हे तया ।
ज्ञानदेवाचिया सोई पाहे ॥३॥
वसिष्ठाचे हाते पावले श्रीरामा ।
ऐसे काय तुम्हा ठावे नाही ॥४॥
नारदाचे हाते दिधले बहुता ।
रोख नाही देता झाला कोणा ॥५॥
चांगदेवाप्रती मुक्ताईकडून ।
देवविले जाण ज्याचे त्यासी ॥६॥
बाबाजीचे हाते तुकोबाचे रिण ।
फेडविले जाण येणे खरे ॥७॥
ऐसे किती सांगो युगायुगी तुज ।
बोलियेले गुज संतसाधु ॥८॥
बहेणि म्हणे आता त्या तरी दाविजे ।
येथे रोख माझे फेडावया ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग