ऐसे स्वर्गवासी अमर |
1014.
ऐसे स्वर्गवासी अमर | ते आपुलाले ठायी स्थिर | राहोनि करिती जयजयकार | पुष्पवृष्टी ज्ञानदेवावरी ॥१॥
धन्य धन्य तू विष्णुभक्ता | ज्ञानदेवा तू समर्था | म्हणौनि पडती पुष्पचळथा | ज्ञानदेवावरी ॥२॥
अनंत तीर्थांचा मेळ | उदके शिंपिती ब्रह्मगोळ | लोहगिरी सुवर्णाचळ | त्यावरी आळंकापुरी ॥३॥
म्हणती धन्य धन्य हे जन | जेथे जो करील कीर्तन | तया जोडे वैकुंठस्थान |चतुर्भुज होऊन जाईल ॥४॥
देव म्हणती इंद्रासी | तू पूर्वी येथेंच होतासी |आणि ब्रह्मा रूद्र तापसी | पूर्वापर हे पुरी असे ॥५॥
क्रृत त्रेत हे व्दापारादि | तेथे सकळांची समाधी | धन्य ज्ञानदेव गोविंदी | रतोनी येथे बैसले ॥६॥
इंद्र म्हणे विष्णुभक्त थोर | प्रत्यक्ष हेहि हरिहर | निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर | हेहि अवतार हरीचे ॥७॥
ऐसे सांगितले समस्ता |मग विदित जाले उभयता | शक्र जाहला निघता | ब्रह्मा आदि करूनी ॥८॥
शेषही पाताळासी गेला | पुंडरिक गोपाळ राहिला | आळंकापुरा स्थिरावला | सकळा भक्ता सहित ॥९॥
सवे संतांचा मेळ | ऐसा राहिला गोपाळ |नामा म्हणे चक्रपाळ | पुढे कैसे वर्तले ॥१०॥
