जगदानिया हे ब्रीद आह
1495.
जगदानिया हे ब्रीद आहे जगी | ते आजि मजलागी काय जाले ॥१॥
मज पाहता विसरु पडिला त्या नामाचा | की तुज आमुचा वीट आला ॥२॥
सुजाणाच्या राया परिसे केशिराजा | भक्ताचिया काजा लाजो नको ॥३॥
भक्तकाजकैवारी है ब्रीद चराचरी | ते ठेविले क्षीरसागरी लक्ष्मीपाशी ॥४॥
मज पाहता अभिलाप धरिला मानसी | मग तू हृषिकेशी विसरलासी ॥५॥
दीनानाथ ऐसे नाम बहुतांसी वांटिले | निर्गुण ते उरले तुजपाशी ॥६॥
म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हा | विनवितसे नामा विष्णुदास ॥७॥
