तंव म्हाळसेनाचिया सै
2165.
तंव म्हाळसेनाचिया सैनी । अंबर गर्जिन्नला निशाणी । शंख नादाचिया ध्वनी । नाद कोंदे ॥१२६॥
अतिरथी आणि महारथी । वीर घालाघाली करिती । ते सिंहनादे गर्जती । महावीर ॥१२७॥
वीरसेनु दळभंजनू । वीरबाहो सबल बाहानू । अग्निकेतु रणमर्दनू । पराजितु ॥१२८॥
ऐसे सैन्यकहो वीर । सौर-पणे रणरंगधीर । जेंही जिंकिले नृपवर । मेदिनीचे ॥१२९॥
ऐसे सैन्य चालिले रणी । मागुती परतली आयिनी । पुढती द्बंद्बयुद्धे मांडोनी । तुंबळ झाले ॥१३०॥
वीर पेटले महा-मारी । वरुषताती खडतर शरी । तेथे जुगांत झाले भारी । कौरव सैन्या ॥१३१॥
तया कौरव सैन्या आंतू । थोर हलकल्लोळ होतू । जैसा मांडला आवर्तू । प्रळयकाळी ॥१३२॥
तंव कर्ण द्रोणे वाहले । कौरवसैन्य एकवटले । तेथे घोरांदर झाले । महा दारुण ॥१३३॥
बाणजाळ सुटले कैसेम । सूर्यमंडळी अभ्र जैसे । सूर्यकिरण न दिसे । अंधकारी ॥१३४॥
बाणी खोंचले सकळ सैन्य । परी न भंगेची दारुण । ते देखताहे ह्माळसेन । महावीरु ॥१३५॥
मग तेने पेलिला रथू । जेंवी काळवरी कृतांतू । की चंद्रावरी राहूकेतु । पर्व-समयी ॥१३६॥
की काळावरी महाकाळू । की दैत्यसैन्यावरी रण-कंदोळू । की मनामाजी परिवळू । दाहो जैसा ॥१३७॥
की सृष्टि सं-हारिता तयेवेळी । जैसा विखे चंद्रमौळी । की वडवानल समुद्रजळी । दांहो करी ॥१३८॥
तैसा तो ह्माळरोन । संहारी कौरवसैन्य । बाण नव्हती ते दारुण । काळदंड ॥१३९॥
ना आणिकु एक मज गमत । खेळ खेळताहे श्रीअनंत । ह्याळसेने निमित्ये । कौरवासी ॥१४०॥
ऐसा उठावला महावीर । फांकले तेजाचे अंकूर । पळोन गेला अंधकार । रविबिंब जैसे ॥१४१॥
शंख वाहिला घनघोषू । गर्जिन्नला स्वर्ग लोकू । पाताळभुवनी शेषू । कांपिन्नला ॥१४२॥
जेणे रथासि वेगु देऊनि । पावला टाकितु आरणी । कौरव सैन्य भंगुनी । सैन्यका वीरा ॥१४३॥
देखोनि कुंजरांचा भारू । खवळिला महावीरू । करिता झाला घोरू । गदाघाते ॥१४४॥
एकाते धरितु चरणी । एकाते टा-कितु गगनी । कुंजरभर संहारूनि । चालिला पुढा ॥१४५॥
पुढा दे-खोनि असिवारा । प्रवर्तला महा मारा । तंव पुढा रमावरा । देखता झाला ॥१४६॥
मग रथे रथु हाणे । घे घे पुढिलाते ह्मणे । आकाशी टाकी सत्राणे । टाकी यासी ॥१४७॥
तो मनाते टाकी मागे । पवन आटोपे वेगे । जैसा मीनु तरंगे । समुद्र जळी ॥१४८॥
तो सैरावैरा धांवतु । पाठी येताहे रथु । तयाचा वर्णिता पुरुषार्थ । खुंटली वाणी ॥१४९॥
तंव द्रोणासि देखोनि नयनी । तो धाविन्नला चरणी । गदाघाते संहारूनि । चारी वारू ॥१५०॥
