मना पवना वेगु नाही ।
2164.
मना पवना वेगु नाही । तैसा धांवसु तसे पाही । संहारितु गदाघांई । कौरवांसी ॥१०१॥
अश्वत्थामा केला विरथू । कृपाचार्य सांडी रथू । सबळु पळाला जी-वंतू । देखोनिया ॥१०२॥
मग पाचारिला दुर्योधनू । आता राखे आपुला प्राणू । नातरी रिघाणे शरणू । युधिष्ठिरा ॥१०३॥
तंव पावला दुर्मदू । एकवटले दोघे बंधू । करूनि सिंव्हनादू । मिसळले घांई ॥१०४॥
दुर्मदु ह्मणे म्हाळसेनासी । बहु बोलता पार जासी । आपणा-कडे न पाहसी । मी कवणु ऐसे म्हणोनि ॥१०५॥
सुखे असत आ-पुले ठासी । नेणसी सुखदु:खा कांही । तो तू मराया आपल्या पायी । आलासी येथे ॥१०६॥
पुरे आयुष्याची विधी । जेवि सर्पु लागे पानधी । तुज कवणे शिकविली बुद्धी । मतिहीने ॥१०७॥
जरी चिर-काळ असे जिणे । तरी जाय नगर टाकून । वृथा वेंचूनि प्राण । कासया जासी ॥१०८॥
आम्ही तरी आपुले तरी आपुले गांठी । बांधली मरणाची खुंटी । विधि पुरलिया शेवटी । वांचुन तेणे ॥१०९॥
पाहे पा कालचे दिवसी । जे परी झाली बा अभिमन्यासी । तरी ओकूनिया का प्राण देसी । वृक्षा काजे ॥११०॥
तंव बोलिला ह्माळसेनू । हे जाणे भेडसावणे । आधी गाठी बांधोन मरण । आलो येथे ॥१११॥
परी देख तुझे अंतरंग तू । या अकरा क्षोणि स- हितू । तुह्मी पावाल मृत्यू । एकेएकु ॥११२॥
तुमचे निर्वंश होती । हे देखतसे अंतर्गती । पांडव राज्य करिती क्षिती । निश्चयेंसी ॥११३॥
धन्य धन्य अभिमन्य । तेणे रणी वेंचिले प्राण । अंती तुष्टला नारायण । मुक्तिदाता ॥११४॥
आजी पितयाचे कारणी । माझे प्राण वेंचले रणी । परी सदैव मजहुनी । दुजा नाही ॥११५॥
असो तुह्मासी काय नीती । तुह्मी असा पापमूर्ती । तुम्हांसी कैंची मती । भूमिभार ॥११६॥
ऐसे बोलोनी खडतरी । दुर्मदु विंधिला दाही शरी । ते बाण नहेती मलार्ही । यमदंड ॥११७॥
तंव दुर्मदे केले संधान । चारी सांडुनी तोडून । सहा बाण तिष्टपणे । पावले वेगी ॥११८॥
चारी चहू वारुयांसी । एकु भेदला सारथीयासी । एंकु भेदला दुर्मदासी । एकु पडला रणी ॥११९॥
ते देखोन दुर्योधन । पळाला रथ मुरडुन । हासिन्नला म्हाळसेन । म्हणे परतोन पाहे ॥१२०॥
तंव द्रोणु सावधु झाला । दळभारु एकवटला । तेथे संग्रामु झाला । अति दारुण ॥१२१॥
कृपाचार्य आणि द्रोणू । अश्वत्थामा आणि सूर्यनंदनू । भूरिश्रवा विकर्णू । सोमदंतु ॥१२२॥
सोरट आणि पढीवारू । चीन चीनभोठ आणि बर्बरू । परी एकला न सावरू । बागड राये ॥१२३॥
अतिबळ आणि सबल । कळाईत निकुंभ अनिळ । ऐसे एकवटले दळ । कारैवांचे ॥१२४॥
सैन्या कुंचा भवंडिला । शंखनादे कोंदाटला । येथे सवेंचि पावला । दुर्योधनू ॥१२५॥
