दर्शन याचे आदरे घेता
422.
दर्शन याचे आदरे घेता ।
ओपी सायुज्यता मुक्तीते ॥१॥
न मानी कोणा साने थोर ।
दाता उदार जगदानी ॥२॥
शरणांगताचा आदरी ।
वैषम्य अंतरी असेचिना ॥३॥
निळा म्हणे भावचि गाठी ।
देखता साठी करु धावे ॥४॥
422.
दर्शन याचे आदरे घेता ।
ओपी सायुज्यता मुक्तीते ॥१॥
न मानी कोणा साने थोर ।
दाता उदार जगदानी ॥२॥
शरणांगताचा आदरी ।
वैषम्य अंतरी असेचिना ॥३॥
निळा म्हणे भावचि गाठी ।
देखता साठी करु धावे ॥४॥