वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 195. कली प्रभाव

कांही सांगोनि गेले व

🙏 4. संत नामदेव · ABH-082275 · अभंग क्र. १८३५

1835.
कांही सांगोनि गेले वचना | कृष्ण उपदेशी पंडुनंदना |येथे राहता पाविजे बंधना | थोर वर्तमान कलियुगी ॥१॥
या कलिमाझारी | पुत्र पित्याचे वैरी |घरची माता होय कामारी | पुरुषांते नारी अव्हेरिती ॥२॥
न येती वृक्षा फळे आटती धेनु | न पिके मही न वर्षे घनु |यापरी आटेल सकळ जनु | ऐसे जगजीवनु बोलिले ॥३॥
आणिक एक वर्तेल अपवित्र | ब्राह्मण सांडितील वेदमंत्र |आचार सांडूनि होती शुद्र | ऐसे अपवित्र कलियुगी ॥४॥
थोर वर्तमान पडेल काळु | चहु वर्णांचा होईल एकचि मेळू |कोणी कोणाचा न धरितो विटाळु | मग गोपाळु निघते जाले ॥५॥
आता वेळोवेळा सांगो किती | मोडला धर्म जाली प्रवृत्ति |विष्णुदास नामा येतो काकुळती | कैसेनि करू भक्ती पंढरीराया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग