वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 195. कली प्रभाव

ऐसा कलियुगींचा आचार|

🙏 4. संत नामदेव · ABH-082267 · अभंग क्र. १८३४

1834.
ऐसा कलियुगींचा आचार| क्रियाभ्रष्ट जाले नरः ॥१॥
मंचकावरी बैसे राणी | माता वाहतसे पाणी ॥२॥
स्त्रियेसी अलंकार भूषण | माता वळितसे शेण ॥३॥
स्त्रियेसि पाटावाची साडी | माता नेसे चिध्या लुगड़ी ॥४॥
सासुसासन्या योग्य मान | मायबापा न घाली अन्न ॥५॥
साली सासवा आवडती | बहिण भावा तोंडी माती ॥६॥
स्त्रियेसी एकांत गोडी | मातेसी म्हणे रांड वेडी ॥७॥
म्हणे विष्णुदास नामा | ऐसा कलियुगींचा महिमा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग