येई गे माधवी पाजी प्
623.
येई गे माधवी पाजी प्रेमपान्हा | विषयाचा आंदणा नको करू ॥१॥
धांव तू मधुकरे माधवे उदारे | येई तू सोइरे जननिये ॥२॥
जंव तू न येसि तंव कोणा पावे मज | माझे जीवीचे गुज कोण पुसे ॥३॥
कष्टलो वेरझारी शीण दूर करी | येई तू झडकरी माधवे वो ॥४॥
अनंता वो नामे पुराणे पढती | पावसी आकांती विठ्ठल वो ॥५॥
नामा म्हणे लाहो करावा माधवे | माझेनि वो जीवे लाहे चाड ॥६॥
