आताहि जे गाती नामे ।
1002.
आताहि जे गाती नामे ।
ते पावती निजात्मधामे ॥१॥
ऐसी नामा अंगी शक्ती ।
आहे ठेविली श्रीपति ॥२॥
मुख्य पाहिजे विश्वास ।
निद्रा सांडूनिया आळस ॥३॥
निळा म्हणे जे जे गाती ।
ते ते परमपदा जाती ॥४॥
1002.
आताहि जे गाती नामे ।
ते पावती निजात्मधामे ॥१॥
ऐसी नामा अंगी शक्ती ।
आहे ठेविली श्रीपति ॥२॥
मुख्य पाहिजे विश्वास ।
निद्रा सांडूनिया आळस ॥३॥
निळा म्हणे जे जे गाती ।
ते ते परमपदा जाती ॥४॥