कृपाघने वृष्टी केली
769.
कृपाघने वृष्टी केली ।
माझी निवविली निजांगे ॥१॥
म्हणोनिया वारंवार ।
त्याचे उपकार आठवितो ॥२॥
न घेउनी काही सेवा ।
धाविले कुणवा आपुलिया ॥३॥
निळा म्हणे सुखी केले ।
हाती धरिले वरदाने ॥४॥
769.
कृपाघने वृष्टी केली ।
माझी निवविली निजांगे ॥१॥
म्हणोनिया वारंवार ।
त्याचे उपकार आठवितो ॥२॥
न घेउनी काही सेवा ।
धाविले कुणवा आपुलिया ॥३॥
निळा म्हणे सुखी केले ।
हाती धरिले वरदाने ॥४॥