विरहिणी विरहा विरहित
123.
विरहिणी विरहा विरहित बोले । का वो पुर्वकर्म आड ठेले ।
वाचे न येती नाम सावळें । तया विरहा मन माझे वेधले ॥१॥
ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठे गेला नेणो सांवआळा ।
पहाता पहाता ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥
नेणो कांही कर्म आड ठेले । वियोग वियोगाचे वर्म ऐसे जाले ।
एका जनार्दनी कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥
