शाकार भारे मस्तकी वा
3602.
शाकार भारे मस्तकी वाहिले । घर शाकारिलें नामयाचें ॥१॥
दामशेटी पुसे कोठील तू कोण । येरु म्हणे जाण वस्ती येथे ॥२॥
बिर्हाड तुर्ती माझे राउळाभीतरीं । विठूजी निर्धारी नाम माझे ॥३॥
तूमच्या नामयाची ममता मज असे फ़ार । एका जनार्दनी निर्धारे ऋणी त्याचा ॥४॥
