महारीण करिती जोहार ।
3903.
महारीण करिती जोहार । पाटीलबाजी तुम्ही हुशार । आले यमाजी हुद्देदार । त्यांचाजीवावरील मार । बरी गत नाही ॥१॥ पायांपडतें महारीण ॥धृ.॥ तुमची बाकी तुम्ही सारा । वाउगा का घालिता चारा । तुमची रांडा पोरेंआवरुनी धरा । नका जाऊ दुसरे द्वारा । धड गतनाहीं ॥२॥ गांवांची पाटलीण ओढाळ भारी॥दिवसा नागवी रस्ते चारी । गांवांतील रयत पळाली । सारी । वाउगी हाव धरिता भारी । पुढे बरें नाहीं३दिवा लावावया नाही कोणी । सारें खाऊनजाहली रिती गोणी । शेवटी टिपक्याचे तम्हीधनी । माल खाऊनि केली धुळधाणी । विचारबरा नाही ॥४॥ तुम्ही बैसतां पलंगावरी । तुमच्यासेवेसी सहा चार नारी । त्याचे सुख तुम्हा वाटतेंभारी । येईल यमाजीची स्वारी । पळाया वाटनाहीं ॥५॥ पुढे न दिसे तुमचे बरें । आले यमाजीबाजी हजरे । धरती जिवाजी तुम्हांस निरेिं । तेथेंकोण सोडवी पोरें । मोठे दुःख पाही ॥६॥ महारीणबोलते बोला । तुम्ही सांडा गर्वाचा चाळा । एकाजनार्दनीं भेटला । एकपणे एक देखिला । आतादुःख नाही ॥७॥
