पाया पडत्ये महारीण आ
3902.
पाया पडत्ये महारीण आली ॥धृ.॥ महारिणीचे बोल ऐका । गांव वसाड पाडू नका । हकनाक बसेल धक्का । इतुके तुम्ही मनी तर्का ॥१॥ ब्रह्मा विष्णु दोन्ही बाळ । महाकाळाचे हे काळ । मज देखता गोपाळ । ते मज महारिणीपासोनी ॥२॥ एका जनार्दनी महारीण झाले । सद्गुरुला शरणगेलें । यानें आपुलें स्वहित केले । जन्ममरण विसरले ॥३॥
