चांगला तरी पूर्णकाम
4064.
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचेंचि नाम । दयाळु तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊ नेदी ॥१॥
उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणाचीच रासी । जाणता तयासी तोचि एक ॥धृपद॥
जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळी गोवळा । लाघवी अबळाभुलवणा ॥२॥
गांढया तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशी रत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥
खेळतो येणेचि खेळावा । नट तो येणेचि आवगावा । लपोनि जीवी न कळे जीवा । धरिता देवा नातुडेसी ॥४॥
उंच तरी बहुतचि उंच । नीच तरी बहुतचि नीच । तुका म्हणे बोलिलो साच । नाही अहाच पूजा केली ॥५॥
अर्थ :
हा देव इतका चांगला आहे की तो पूर्ण काम आहे जर काही गोड असेल तर केवळ याचेच नाम आहे. दयाळू हा धर्म सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ आहे आणि देव हा अतिशय दयाळू असून तो खूप चांगला आहे तो आपल्या भक्तांना कधीही त्रास होऊ देत नाही आपल्या दासांना तो कधीही श्रम होऊ देत नाही. देवाला श्रीमंत आणि उदार म्हणावा तर लक्ष्मी त्याची पत्नी आहे आणि झुंजार व शूर म्हणावे तर कळीकाळ देखील त्याला थरथर कापतात चतुर म्हणावे तर देव सर्व गुणाची रासच आहे. आणि त्याला जाणावे असे म्हटले तर तो कोणालाही जाणत नसून तो स्वत:लाच जाणत आहे. हा हरी इतका पुरातन आहे की तो सर्वांच्या पूर्वीच्या आधीचा आहे. त्याची लीला कोणालाही कळत नाही. हा देव सर्व जाणता असून देखील लहान नेणता बालक होऊन गवळयांची गुरे राखीत आहे आणि आपली लीला दाखवून सर्व गोपीकांना हा देव भूलवित आहे. या हरीवर ज्याचा खरा भक्तिभाव असून त्याचे जे कुणी अंकित आहेत त्यांच्यापुढे हा देव इतका भ
