वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

बहु जन्म बहु फेरे ।

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075344 · अभंग क्र. १५७

157.
बहु जन्म बहु फेरे । बहु शिणलो वेरझारे ।
वाळले पांझरे । दया न ये विठोबा ॥१॥
आता पुरे तुमच्या गोष्टी । कोरडे चाळवण दृष्टी ।
झालो बहु कष्टी । दुःखभरे विठोबा ॥२॥
किती संसाराचा छंद । राति दिवस हाचि छंद ।
राम कृष्ण हरि गोविंद । नाठवेचि विठोबा ॥३॥
चोखा म्हणे नको मुक्ति । घडो संतांची संगती ।
उच्छिष्ट पंगती हेचि द्यावे विठोबा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग