वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

बाप षड्गुण-ऐश्वर्ये

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076331 · अभंग क्र. ४९५

495.
बाप षड्गुण-ऐश्वर्ये थोर तू जालासी ।
नावडे आम्हासी काय तैसे ॥१॥
लक्षुमी यश कीर्ति औदार्य वैराग्य ।
ज्ञानाने ते सांग सर्व आले ॥२॥
हेचि भांडवल तुझे आहे हाती ।
याने तू श्रीपती म्हणविसी ॥३॥
करूनि अकर्ता तू जैसा आहेसी ।
मज काय तैसी कळा नये ॥४॥
तू जैसा व्यापक सर्वाठायी हरी ।
मी काय विचारी नव्हे तैसी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग