स्थूळ ना सुक्ष्म कार
504.
स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥
पुंडलिकाचें प्रेमे मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥
निंद्य वंद्य जगी यावेंभेटीलागीं । दरुशने उद्धार वेगी तया गे माय ॥३॥
ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा । एका जनार्दनी डोळा देखिला गे माय ॥४॥
