न सांपडे हाती वाउगी
30.
न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥ बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥ समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारे । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तया । बोभाट तो वाया वाउगाची ॥४॥
