वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

ज्ञानदेव म्हणे परिये

🙏 4. संत नामदेव · ABH-081615 · अभंग क्र. ९२४

924.
ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा | तू सुखसंतोषा पात्र होसी ॥१॥
प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयी आला | तू का वेळोवेळा खंती करिसी ॥२॥
विचारी सावध होवोनि भक्तराजा | सुखानंदु तुझा तुजची जवळी ॥३॥
मी नेणे ज्ञानगती नेणे योग्ययुक्ति | न देखे विश्रांति एकेविण ॥४॥
सर्वभावे मज तेंचि रूप आवडे | जे पुंडलिकापुढे उभे असे ॥५॥
तो माझा विठ्ठल दावा दृष्टी भरी | आस मी न करी आणिकांची ॥६॥
व्यापकु विठ्ठलु आहे सर्व देशी | जरी सांडोनिया पाहसी भेदभ्रमु ॥७॥
तो नाही ऐसा ठाव उरलासे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ॥८॥
काया वाचा मने मज तोचि व्हावा | गीती गाता जीवा सुख वाटे ॥९॥
ऐकावा श्रवणी पाहावा तोचि नयनी | नवजावा जवळोनी दूर कोठे ॥१०॥
जे अक्षर अव्यक्त देशकाळरहित | ज्ञानी उपासित सोहंभावे ॥११॥
सर्वेंद्रियांसहित आवरोनि चित्त | भोगिती अद्वैत नित्य सुख ॥१२॥
सर्व सुख मज आहे त्याच्या पायी | आणिकांच्या वाही न पडे कदा ॥१३॥
तेथे माझे मन रंगलेंसे भावे | सुख येणे जीवे देखिले डोळा ॥१४॥
सर्वगत संपूर्ण सर्वकाळ असणे | होणे आणि जाणे नाही जया ॥१५॥
ते तुज माझारी तू तयाभीतरी | अनुभवी निर्धारी ठेवुनी मन ॥१६॥
मी न मनी न मनी लटिकी हे कहाणी | जळधरावांचोनि चातक जैसा ॥१७॥
तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस | पंढरीनिवास जीवन माझें॥१८॥
ऐसे ऐकोनि बोलणे म्हणे ज्ञानदेव | धन्य तुझा भाव एकविध ॥१९॥
नामा म्हणे माझ्या सुखाचा विसावा | आवडे या जीवा पंढरीरावो ॥२०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग