वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

ऐसे सुखरूप दोघे चालत

🙏 4. संत नामदेव · ABH-081606 · अभंग क्र. ९२३

923.
ऐसे सुखरूप दोघे चालताती मार्गी | परी चित्त पांडुरंगी नामयाचे ॥१॥
क्षणाक्षणा वास परतोनी पाहे | वियोग न साहे पंढरीचा ॥२॥
म्हणे का गा केशीराजा मोकलिले माते | न येसीच सांगाते सांभाळीत ॥३॥
चिंतातुर थोर पडिलो ये परजनी | न दिसे माझे कोणी जिवलग ॥४॥
फुटोनी हृदय होती दोन्ही भाग | बहु मज उद्वेग वाटताती ॥५॥
तू माझी जननी तू माझा जनिता | तू बंधु चुलता पंढरीराया ॥६॥
इष्टमित्र तूंचि तूंचि गणगोत | तूंचि कुळदैवत आवडते ॥७॥
तूंचि माझे व्रत तूंचि माझे तीर्थ | तूंचि धर्म अर्थ काम देवा ॥८॥
तूंचि ज्ञानचक्षु तूंचि माझा लक्षू | तूंचि माझा साक्षु स्वभावासी ॥९॥
साच की लटिके हे माझे बोलणे | तुजवांचुनि जाणे कवण दुजा ॥१०॥
नामा म्हणे आपुले अनाथ सांभाळी | येउनी हृदयकमळी राहे माझ्या ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग