कृपाळु उदार । उभा कट
651.
कृपाळु उदार । उभा कटी ठेवुनी कर ॥१॥
सर्व देवांचा हा देव । निवारीं भेव काळांचें ॥२॥
निघतां शरण काया वाचा । चालवी त्याचा योग क्षेम ॥३॥
दृढ वाचे वदता नाम । होय निष्कामसंसारीं ॥४॥
एका जनार्दनी ठेवणें । खंरे ते जाणे पंढरीं ॥५॥
