धन्य आजि दिन । झाले
60.
धन्य आजि दिन । झाले संतांचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥२॥
झाले समाधान । पायी विसावले मन ॥३॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥४॥
60.
धन्य आजि दिन । झाले संतांचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥२॥
झाले समाधान । पायी विसावले मन ॥३॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥४॥