हनुमंताची आरती ३९९७
3997.
हनुमंताची आरती ३९९७
जयदेवा हनुमंता । जयजयअंजनीसुता । आरती वोवाळीन । राया रामाच्या दुता ॥धृ.॥ वानरी रुपधारी ज्याची अंजनी माता । हिंडतां वनांतरीं । भेटी झाली रघुनाथा । धन्य तोरामभक्त । तेही मांडीली कथा ॥१॥ सितेचे शुध्दीसांगे । रामे दिधली आज्ञा । उल्लंघुनी समुद्रतीर । गेले लंकेच्या भुवना । शोधिलें अशोकवन । मुद्राटाकीली वुण । सितेसी दंडवत । दोन्ही कर जोडुन॥२॥निकुब बळे इंद्रजीत । होम करी आपण । तोहीतो विध्वंसीला । लघुशंका करुन । देखुन पळताती । भुतेंमहादारुण ॥३॥ देऊनी भुभु:कार । नरलोकआटलो रामही लक्षुमण । जरी पाताळी नेले । तयांचेशुध्दीसाठीं । जळी प्रवेश केले । अहिरावणमहिरावण । क्षणामाजी निर्दाळीले ॥४॥ हनुमंतानाम तुंते । किती वर्ण मी दातारा । अससी सर्व ठायी । आजुबाजुआमरा । स्वामीसी सोडविले । दिनानाथमाहेरा । एका जनार्दनी । मुक्ति झाली संसारा॥५॥
