वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

हेचि भवरोगाचे औषध ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072950 · अभंग क्र. ४०५०

4050.
हेचि भवरोगाचे औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक काही नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥
सांवळे रूप ल्यावे डोळा । सहा चौ अठरांचा मेळा । पदर लागो नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥धृपद॥
भोजना न द्यावे अन्न । जेणे चुके अनुपान । तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥
नये निघो आपुलिया घरा । बाहेर लागो नये वारा । बहु बोलणे ते सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥
पासी ते एक द्यावे वरी । नवनीताची होईल परी । होईल घुसळिले ते निवारी । सार भीतरी नाही तया ॥४॥
न्हाये अनुतापी पाघरे दिशा । स्वेद निघो दे अवघी आशा । होसिल आधि होतासि तैसा । तुका म्हणे दशा भोगी वैराग्य ॥५॥

अर्थ :
जन्म, जरा, व्याधी तोडण्याचे आणि भवरोगाचे क्षमन करण्याचे हेच खरे औषध आहे, या औषधाने इतर कोणतीही बाधा होत नाही आणि षडविकाराचा नाश देखील हे करते. ते औषध म्हणजे तुम्ही सावळया हरीचे रुप डोळयामधे धारण करा. ते सहा शास्त्र, चार वेद आणि अठरा पुराणांचा मेळा आहे. दुष्ट लोकांचा स्पर्श देखील स्वत:ला होऊ देऊ नको आणि विष्णू सहस्त्र नाममंत्राचे सतत जप करत राहा. जेणेकरुन अनुपानात चूक होईल असे अन्न भोजनास देऊ नये. असे जर तुम्ही वागलात तरच उपयोग आहे आणि मी तुम्हाला वरती सांगितलेल्या औषधाचा गुण असे वागल्यानेच येईल हे तुम्ही सत्यभावनेने जाणून घ्यावे. आपल्या नीजस्वरुपरुपी घरातून बाहेर येऊ नये आणि बाहेर येऊन देहभाव देहअहंकार याचा वारा लागू देऊ नये. फार जास्त बोलू नये हे मुख्य सार आहे आणि हरीवाचून दुसरा कोणाचाही संग करु नये दुस-याची संगती वर्ज्य करावी. आपल्याजवळ जे चित्त आहे ते हरीला दयावे म्हणजे त्या

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग