संतांचा महिमा वर्णाव
30.
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥
अर्जुना संकट पडता जडभारी । गीता सांगे हरी कुरुक्षेत्री ॥२॥
तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥
गीता शोधोनिया अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥
जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामे । साधन हे आणिक नेणे न करी काही ॥५॥
एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचे ते ॥६॥
