सद्गुरूचे नाम नाही ज
344.
सद्गुरूचे नाम नाही ज्याचे मुखी ।
तो जाणावा सुतकी सर्व काळ ॥१॥
ऐसे ते जाणावे गुरूद्रोही अभक्त ।
केला तो परमार्थ वाया जाय ॥२॥
सद्गुरूचा महिमा न बोले वो वाचे ।
पूर्वज तयाचे अधोमुख ॥३॥
सद्गुरूपदाचे न करी उच्चाटण ।
जाणावे ते श्वान जन्मा आले ॥४॥
कुलगुरू कुलदेव विद्या जो शिकवी ।
त्यासी तो नाठवी तो अन्य-बीज ॥५॥
माता आणि पिता सद्गुरू भयहर्ता ।
त्यासी नाठविता पातकी तो ॥६॥
जाती पै विजाती गुरू हो का कोन्ही ।
लोपी जो या जनी हत्या त्यासी ॥७॥
बहेणि म्हणे आम्हा गुरू ‘ तुकाराम’ ।
सदा नाचो प्रेमगीती गाता ॥८॥
