वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

रूपे श्यामसुंदर निलो

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073236 · अभंग क्र. १२२

122.
रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा । सखीये स्वप्नी शोभा देखियेली ॥१॥
नेत्र विशाळ भाळ दंत हिरया ज्योती । बाइये मदनमूर्ति देखियेला ॥२॥
शंख चक्र गदा शोभती चहू करी । सखीये गरुडावरी देखियेला ॥३॥
शयन शेषापृष्ठी नभी परमेष्ठी । गंगा वामांगुष्ठी देखियेला ॥४॥
पीतांबर कटीतटी दिव्य चंदन उटी । सखीये जगजेठी देखियेला ॥५॥
विचारीता मानसी नये जो व्यक्तीसी । नामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग