प्रर्हाद नारद पराशर
7.
प्रर्हाद नारद पराशर पुंडरीक । व्यास आणि वा-ल्मिक नमीयले ॥१॥
दालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शूक नमीयले ॥२॥
रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण । केलेंसे नमन याजलागी ॥३॥
टीकाकार श्रीधर बहिरंभट चतुर । करा नि-रतंर कृपा मज ॥४॥
साधुसंतसिद्ध शिरी ठेवा हात । वर्णींन स-मस्त कृष्णलीला ॥५॥
नामा मनी आठवी खेचरचरण । तयाच्या कृपेने सिद्धि जावो ॥६॥
