बरे हे वाईट आहे माझे
155.
बरे हे वाईट आहे माझे भाळी । ते सुखे हो बळी जीवे माझ्या ॥१॥
आता कोणावरी रूसो नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥
आहे जे संचित तैसे होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥
चोखा म्हणे आता बहु लाज वाटे । झाले जे वोखटे कर्म माझे ॥४॥
