वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १०, देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१

परतोन पाहासी न बोलसी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074879 · अभंग क्र. ३३८

338.
परतोन पाहासी न बोलसी आम्हांसी ।
तुझीया रूपासी नांव नाही ॥१॥
सांगता नवल पाहता बरळ ।
मायामृगजळ देखियेले ॥२॥
ज्ञानदेवो म्हणे उफराटिये दृष्टी ।
परतोनिया भेटी देई क्षेम ॥३॥

अर्थ :
देहादि अनात्म पदार्थावरील दृष्टी फिरवून जर तू यथार्थ आत्मस्वरूप पाहशील तर तू आमच्याशी बोलणारच नाहीस. याचा अर्थ बोलण्याला तू वेगळा उरणार नाहीस. म्हणून तुला नामरूप नाही त्या तुझ्या विषयी बोलण्याचा व पाहण्याचे प्रयत्न करणे वेडेपणाचे आहे. कारण बोलणे चालणे हे द्वैतात असते. व ते द्वैत मायाकार्य असून मृगजळाप्रमाणे आहे. विचाराने दृष्टी अंतर्मुख करून जर परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो परमात्मा भेट देईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग