अवघाची संसार सुखाचा
387.
अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बापरखुमादेवीवरू विठ्ठालाची भेटी ।
आपुल्या संवसाठी करुनी ठेला ॥४॥
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
