वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १२. देवाची स्तुति

वस्तुचा जो स्वाभावगु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089385 · अभंग क्र. ५२६

526.
वस्तुचा जो स्वाभावगुण ।
वोसंडू नेणे तो आपणा ॥१॥
तेवि हा परमात्मा श्रीहरी ।
सांडू नेणे आपुली थोरी ॥२॥
जेवी कस्तुरी परिमळ ।
शीतळपणा मलयानिळ ॥३॥
निळा म्हणे परिसपणा ।
नेणे सांडू आपुल्या गुणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग