वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १२. देवाची स्तुति

देवाची स्तुति

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089381 · अभंग क्र. ५२५

525.
देवाची स्तुति

अगा ये नरकासुरमर्दना ।
कुशदैत्यनिकंदना ।
अगा कंसमधुकैटभसूदना ।
अगा मर्दना हिरण्याक्षा ॥१॥
अगा वृत्रासुरनिहंत्या ।
हिरण्यकश्यपा विदारित्या ।
अगा रावण संहारित्या ।
कुंभकरणादीराक्षसा ॥२॥
अगा रिठासुराच्या वैया ।
सहस्त्रभुजांच्या वधणारा ।
अगा निवटीत्या भोमासुरा ।
सत्यभामावरा गोविंदा ॥३॥
अगा ये काळियादमना ।
शकटासुर विध्वंसना ।
अगा शिशुपाळवक्रदंतहनना ।
जरासंधभंजना कागबगा ॥४॥
अगा बळी बंधनाअसुरारी ।
अगाअरिमन्मथ तमारी ।
अगा ताटिकापूतनारी ।
गोवर्धनधारी बळिवंता ॥५॥
अगा ये केशियादमना ।
तृणासुरधेनुकहनना ।
अगा मरिचा सुबाहुउध्दरणा ।
त्रिशिराखरदूषणप्राणहर्त्या ॥६॥
अगा ये विरोचनजाळंधरअंतका ।
अहिरावणमहिरावणघातका ।
कबंधवाळीच्या हंतका ।
रघुकुलटिळका सांबहरणा ॥७॥
अगा ये शंखासुराचिरणारा ।
मच्छरुपिया पोहणारा ।
शुंभनिशुंभाचिया घातणारा ।
मोहनीरुप धरा दैत्यातका ॥८॥
अगा ये अपारभक्तपाळका ।
पंढरीभुवैकुंठनायका ।
विश्व चराचरव्यापका ।
अभय वरदायका निळयाच्या ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग