वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ८. संत पर

ते माझे सायरे सज्जन

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075428 · अभंग क्र. २१८

218.
ते माझे सायरे सज्जन सांगाती । जे आठविती विठोबासी ॥१॥
तयांचे संगती बहु लाभ झाला । ठेवा जो जोडला पांडुरंग ॥२॥
मागिला पुढीला झाला परिहार । ते माझे माहेर भेटलेसे ॥३॥
तयांचे संगती सुखाची विश्रांती । जे का आठविती विठोबासी ॥४॥
चोखा म्हणे ते भवाचे तारक । वैकुंठनायक दाखविती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग