श्रीकृष्ण न्यावा गोक
10.
श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायी स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥ कृष्णीं धरिता आवडी । स्वये विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाही अर्गळा शृखंळा ॥२॥ कृष्ण जंव नये होता । तंवचि बंधनकथा । पावलीया कृष्णानाथा । बंदी मोक्ष ॥३॥ ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वये कृष्ण नेतां ॥४॥ श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥ अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावे असे सांगतु । कृष्णाकडिये पडियेला ॥६॥ अंध ते बंधन नेलें । राखतो राखणे ठेले । एका जनार्दनी केले । नित्य मुक्त ॥७॥
