वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 2. बाळक्रीडा - अभंग ५ ते १२

देवकी वसूदेवाकडे पाह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090453 · अभंग क्र. ९

9.
देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥ जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥ आता मी करु कैसे । भ्रतारा लागले पिंसे । मज मायेच्या ऐसे । पुरुष ममता न धरी ॥३॥ मज मायेची बुद्धी ऐसी । म्या आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगे होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावे ॥४॥ येरु म्हणे नवल जाले । तुज कृष्णे प्रकाशिले । त्वा केवी अच्छादिलें । कृषरुप ॥५॥ सरसर अरजे मूढें । बोलसी तितुके कुडे । कृष्णरुप वाडें कोडे । माया कैंची ॥६॥ येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावे माझे ॥७॥ अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझे मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥ सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावे ॥९॥ तुम्ही न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाही योनिद्वारा आला । कृषाणानाथु ॥१०॥ आता मी काय करु वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥ चोज कैसेवीण । ज्या नाही जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥ जेणे मीपण आभासे । तेणे माझे मूर्खपणें तुम्हा दिसे । हे अंगींचे निजरुप पिसे । न कळे तुम्हा ॥१३॥ कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवे जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणी ॥१४॥ आता काय मी बोलु शब्दू । ऐसा करिता अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥ प्रकृति पुरुष दोन्ही । मीनली एकपणीं । एका जनार्दनी । बंदी मोक्ष ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग