मुक्तीप्रद आहे एक वि
829.
मुक्तीप्रद आहे एक विठ्ठल नाम|आता क्रियाकर्म कवणालागी ॥१॥
राहे राहे तू मना निवांत|ध्याई अखंडित नारायणा ॥२॥
संतसमागम साधी हे साधन|पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥
नामा म्हणे मज श्रीगुरूच्या पायी |तरी वर्म ठायी पडेल जाण ॥४॥