वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

साधक बाधक न बाधी जनक

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090142 · अभंग क्र. २१४

214.
साधक बाधक न बाधी जनक । सर्व हरि एक आम्हा असे ॥१॥
हरिविण नाही हरिविण नाही । हरि हेंचि पाही एकरूप ॥२॥
हरि माझा जन हरि माझे धन । हरि हा निर्गुण सर्वांठायी ॥३॥
निवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला । निमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥४॥

अर्थ:
तो हरि आमचा झाल्या पासुन अनुकुल प्रतिकुल साधक बाधकता आम्हाला बांधु शकत नाही. हरिविण दुसरे काही आम्ही पाहात नाही तोच हरि एकत्वाने आम्ही पाहतो. सर्वाठायी निर्गुण असणारा तो हरी माझे जन ही आहे व धन ही आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या हरिलीलेने प्रत्येक क्षणची कळा हरिमय झाली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग