अंतरी विचार करितो श्
3467.
अंतरी विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरी फ़ार कष्ट ॥१॥
विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हा । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥
जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगी ॥३॥
एका जनार्दनी तुष्टलासे देव । मग कैंचें भेव दैन्याचे ते ॥४॥
