गोपी गर्व
151.
गोपी गर्व
झाला अभिमान धन्य आम्ही आता । लक्षुमीच्या कांता भोगीतसो ॥१॥
गुप्त झाला तेव्हा वैकुंठनायक । करिताती शोक सकळीक ॥२॥
निघाल्या तेथूनि फिरताती वने । यशोदेचे तान्हे धुंडावया ॥३॥
वृक्ष आदि पक्षी पुसती तयांसी । तुम्ही ह्लषि-केशी देखियेला ॥४॥
मृगासी पुसती देखीयेला डोळा । सांगारे सां-वळा कोणी तरी ॥५॥
आम्हांवरी तुम्ही काय रे कोपता । सांगा रे भगवंता पुसतसो ॥६॥
कुरवंडी करू सकळांचे प्राण । देऊ त्या भू-षण अंगावरील ॥७॥
नामा म्हणे जेथे असे अभिमान । तेथे नारा-यण नाही नाही ॥८॥
