वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आणिका उपदेशू नेणे ना

🙏 3. संत तुकाराम · ABH-079807 · अभंग क्र. ३९६१

3961.
आणिका उपदेशू नेणे नाचो आपण । मुंढा वाया मारगेली वाया हासे जन ॥१॥
तैसा नव्हे चाळा आवरी मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥धृपद॥
बाहिरल्या वेषे आत जैसे तैसे । झाकले तो बरे पोट भरे तेणे वेसे ॥२॥
तुका म्हणे केला तरी करी शुद्ध भाव । नाही तरी जासी वाया हा ना तोसा ठाव ॥३॥

अर्थ :
इतरांना उपदेश करण्याचे आम्ही जाणत नसून आम्ही मुंडा म्हणजे देवाबरोबर भक्तिभावाने नाचत आहोत आणि अधिकार नसताना जर उपदेश केला तर त्याला मार खावा लागतो आणि त्याचे जीवन वायाला जाऊन सर्व लोक त्याला हसतात. अशा प्रकारे खोटा चाळा न करता परस्त्री आणि परधनावर मन आणि डोळा ठेवण्याचे आवरावे आणि मागे संत ज्या मार्गाने गेले त्या संतरुपी सोय-यांच्याप्रमाणे आपण वागावे. जर तु बाहेरुन नुसतेच स्वै-यांचे सोंग घेतले परंतू आतमधे काम आणि क्रोध जसेच्या तसे ठेवले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही जोपर्यंत तुमचे आतले स्वरुप झाकले आहे तोपर्यंत ठीक आहे पण एकदा की ते लोकांना समजले तर लोक तुम्हाला हसतील तुमच्या या बाहेरच्या सोंगाने तुमचे पोट तर भरेल पण तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तर तुम्ही तुमचा भक्तिभाव शुध्द केला तर चांगलेच आहे नाही तर तुम्हाला ना संसारात जागा ना देवाजवळ जागा मिळेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग