ऐसे वैरिया मुक्तिदान
59.
ऐसे वैरिया मुक्तिदानी ।
कृपावंत हा सारंगपाणी ।
कंसे ऐकानिया श्रवणी ।
परम खेद मानिजे ॥१॥
कृष्णजवळी होती मुले ।
तिही ते आश्चर्य देखिले ।
वडिला सांगती नवल झाले ।
कृष्णे मर्दिले अपार दैत्या ।
कोट्यावत पसरुनी मुखे ॥३॥
आले कृष्णासान्निध तव ते ।
तेणे अति लाघवे कवतुके ।
भूमीसी आपटूनि मारिले ॥३॥
त्यांची शरीरे पर्वतराशी ।
पडिल्या आहेत गावापाशी ।
चला दाखवितो तुम्हासी ।
म्हणवूनि सकळिकासी हाकारिले ॥४॥
तिही ते देखोनिया दिठी ।
भये कापती आपुल्या पोटी ।
म्हणती अतुर्बळी हा जगजेठी ।
लेंकरु कैसा म्हणावा ॥५॥
नंदहि विस्मयापत्र चिती ।
म्हणे हे कोठूनि असूर येती ।
याचिया हाते पावेनि शांती ।
जाताती मुक्तिपदाते ॥६॥
निळा म्हणे गावीचे लोक ।
करिती अवघेचि कौतुक ।
परी कंसा अधिकाधिक् ।
क्षते उमळती दु:खाची ॥७॥
