कथेची सामग्री । देह
3974.
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥
नको जाऊ देऊ भंगा । गात्रे माझी पांडुरंगा ॥धृपद॥
आयुष्य करी उणे । परी मज आवडो कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणी ॥३॥
अर्थ :
जोपर्यंत देह अवसानावर आहे तोपर्यंतच हरीच्या कथेची सामग्री आहे. त्यामुळे हे पाडूरंगा माझी गात्रे म्हणजे इंद्रिये भंगू देऊ नको म्हणजे शक्तीहीन होऊ देऊ नकोस. देवा हवे असेल तर तुम्ही माझे आयुष्य कमी करा परंतू माझ्या मनात किर्तनाची आवड कायम राहू दया एवढेच माझे मागणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा किर्तनाला विसरणे यापेक्षा दुसरी हानी कोणतीही नाही आणि दुसरी हानी माझ्या मनातही येत नाही.
