गळित झाली काया । हेच
3975.
गळित झाली काया । हेचि लळित पंढरिराया ॥१॥
आले अवसानापासी । रूप राहिले मानसी ॥धृपद॥
वाहिला कळस । तेथे स्थिरावला रस ॥२॥
तुका म्हणे गोड झाले । नारायणी पोट धाले ॥३॥
अर्थ :
हे पंढरीराया शरीराला वृध्दावस्था प्राप्त होणे म्हणजेच लळीत (उत्सवाच्या शेवटी होणारा खेळ) आहे. आता माझा देह अवसानात म्हणजेच शेवटास आला आहे त्यामुळे हरीचेच रुप माझ्या मनामध्ये राहिले आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी भजनाचा कळस गाठला आहे त्यामुळे माझे प्रेम तेथेच स्थिर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाच्या चिंतनाने ब्रम्हरसाचे भोजन अतिशय गोड झाले असून माझे पोट भरले आहे.
