वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

वंदावे ते काय निंदाव

🙏 4. संत नामदेव · ABH-083139 · अभंग क्र. ३३४

334.
वंदावे ते काय निंदावे ते काय |सर्वांसाठी पाहे कोंदाटले ॥१॥
आहे कवणा ठायी नाही कवणा ठायी |ठायींच्या पै ठायी कोंदाटले ॥२॥
रविरश्मीचे तेज सर्वांठायी असे |त्या परि अनायासे बुझतु जाय ॥३॥
भाव तेंचि ब्रह्म ब्रह्म तेचि कर्म |जाणोनिया वर्म म्हणे नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग